टिळक फासिस्ट का झाले नसते?
टिळक आज फासिस्ट झाले नसते, असे जे मला निश्चयाने वाटते, ते त्यांच्या व्यक्तिगत विशेषांमुळे नव्हे, तर तात्त्विक आणि व्यावहारिक अशा सबळ कारणांमुळे. फासिझम हा काही केवळ एक हंगामी राजकीय पक्ष नाही. कम्युनिझमप्रमाणेच फासिझम हेसुद्धा एक तत्त्वज्ञान असून, त्या तत्त्वज्ञानानुसार समाज आणि राज्य यांच्या घटना बदलण्याचे प्रयत्न त्याच्या प्रवर्तकांकडून आज चालू आहेत.......